नवी दिल्ली : कोरोना व्हायरचा फैलाव वाढत आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेली आहे. काळाबाजार वाढत आहे. यावर केंद्र सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केले आहे. मास्क आणि सॅनिटायजरचा काळाबाजार होत असल्याची बाब निदर्शान आणल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. तसेच या वस्तूंच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. या किमती जून महिन्यापर्यंत कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हैंड सेनिटाइजर की 200 ML बोतल की खुदरा कीमत 100 रु. से अधिक नहीं होगी। अन्य आकार की बोतलों की कीमत भी इसी अनुपात में रहेंगी। ये कीमतें 30 जून 2020 तक पूरे देश में लागू रहेंगी। 3/3@drharshvardhan@narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे दर सरकारने आखून दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दोन तसेच तीन स्तरांच्या मास्कचे दर आठ ते दहा रुपये तर २०० मिलिलीटर सॅनिटायझरची बाटली १०० रुपयांना असल्याचं त्यांनी सांगितले. ३० जूनपर्यंत हेच दर कायम राहतील, अशी माहिती पासवान यांनी दिली आहे.
आवश्यक वस्तु अधिनियम के तहत 2 और 3 प्लाई मास्क में इस्तेमाल होने वाले फैब्रिक की कीमत वही रहेगी जो 12 फरवरी 2020 को थी, 2 प्लाई मास्क की खुदरा कीमत 8 रु./मास्क और 3 प्लाई की कीमत 10 रु./मास्क से अधिक नहीं होगी। 2/3 @drharshvardhan @narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020
कोरोना वायरस #COVID19 के फैलने के बाद से बाजार में विभिन्न फेस मास्क, इसके निर्माण में लगने वाली सामग्री और हैंड सेनिटाइजर की कीमतों में बेतहाशा वृद्धि देखी गई है। सरकार ने इसे गंभीरता से लेते हुए इनकी कीमतें तय कर दी हैं। 1/3 @drharshvardhan @narendramodi #IndiaFightsCorona
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 20, 2020
दरम्यान, देशात करोनाने बाधित रुग्णांची संख्या आता २९८ वर पोहोचली आहे. तसेच महाराष्ट्रातही करोना बाधित रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. आज ११ रुग्णांची संख्या वाढून ती ६३ वर पोहोचली आहे.